Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पैसे वाटपाचा संशय : एकाला मारहाण करीत चारचाकी फोडली !
    क्राईम

    पैसे वाटपाचा संशय : एकाला मारहाण करीत चारचाकी फोडली !

    editor deskBy editor deskNovember 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल  :  प्रतिनिधी

    अत्यंत शांततेच्या मार्गाने पार पडलेल्या मतदान प्रचारास अखेर गालबोट लागल्याची घटना घडली. रावेर- यावल विधानसभेच्या मतदानापूर्वी रात्री अज्ञात हल्लेखोराकडून यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील राहणाऱ्या शेती व ठेकेदारीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीला काहींनी गैरसमजीतीतून मारहाण करण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सावखेडा सिम येथील कमलाकर तुळशीराम पाटील (वय ४७) हे २० नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास यावल शहरापासून काही अतंरावर असलेल्या फॉरेस्ट नाका, विरावली रोड मार्गाने चारचाकी (एमएच १२, एमएम ९९००) ने आपल्या घरी जात होत्या. ते तंबाखू खाण्यासाठी फॉरेस्ट नाक्याजवळ थांबले असता अचानक ३० ते ४० वयोगटातील ५ ते ६ मराठी भाषिकांनी मिळून गैरसमजातून कमलाकर पाटील यांना मारहाण केली. दरम्यान, एका उमेदवाराविरूद्ध पैसे वाटप करत असल्याच्या गैरसमजातून पाटील यांची कॉलर पकडून शिवीगाळ करून लोखंडी रॉडने चारचाकी वाहनाच्या चारही बाजुच्या काचा फोडल्या. तसेच त्यांच्या खिशातीत पाकीट काढून घेत घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत कमलाकर पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात या घटनेचा तपास सुरु आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.