Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » निवडणूक कर्तव्यावर असलेल्या बीएलओचा अपघाती मृत्यू
    क्राईम

    निवडणूक कर्तव्यावर असलेल्या बीएलओचा अपघाती मृत्यू

    editor deskBy editor deskNovember 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    तालुक्यातील अनवर्दे – बुधगाव येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले तथा शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील रहिवासी व या निवडणुकीत बीएलओ असलेले लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (वय ४९) यांचा निवडणूक काम आटोपून बभळाज येथील राहत्या घरी दुचाकीने जात असताना गलंगीजवळ २० रोजी रात्रीी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात निधन झाले.

    मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अनवर्दे बुधगांव येथील लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याच ठिकाणी ते मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ होते. तेथून निवडणुकीचे काम आटोपून ते आपल्या शिरपूर तालुक्यातील मूळ गाव बभळाज येथे परत जात असतांना त्यांच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर त्यांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्युची वार्ता समजताच ग.स.चे संचालक योगेश सनेर यांच्यासह मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.