Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » “शहराला हवा चेहरा नवा’, डॉ.अश्विन सोनवणे तुम आगे बढो..च्या घोषणांनी परिसर दणाणला !
    राजकारण

    “शहराला हवा चेहरा नवा’, डॉ.अश्विन सोनवणे तुम आगे बढो..च्या घोषणांनी परिसर दणाणला !

    editor deskBy editor deskNovember 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जोरदार प्रचार सुरु असून दि.१२ नोव्हबेर २०२४ रोजी शहरातील सुप्रिम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, दत्त नगर/अशोक किराणा, काशिनाथ लॉजचा मागच्या परिसरात प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत असून, “शहराला हवा चेहरा नवा, डॉ.अश्विन सोनवणे तुम आगे बढो च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. शहरातील प्रत्येक गल्लीतून त्यांच्यासाठी समर्थन मिळत असून प्रचार रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतांना दिसत आहेत.

    शहराच्या विविध परिसरात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या प्रचार रॅलीत नागरिकांचा जोश, कार्यकर्त्यांचा उत्साह वातावरणात नवी चैतन्याची लहर दिसून आली. डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या उपमहापौरपदाचा अनुभव त्यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. उपमहापौरपदी असताना नेहमीच जळगाव शहरातील नागरिकांच्या समस्येसाठी पुढाकार घेऊन प्रश्न सोडविले आहे. त्यामुळे जळगावकरांच्या मनात विश्वास आणि समर्थन वाढले आहे.

    यांची होती उपस्थिती
    रामचंद्र कोळी, सजु सपकाळे, बुरा कोळी, युवराज कोळी, योगेश सोनवणे, योगेश कोळी, सोनु कोळी, शाम सुर्वे, राहुल कोळी, किरण तीतरे, कोमल सोनवणे, नवल सोनवणे, सागर पाटील, पपू कोळी, अजय पाटील, अशोक कोळी यांची उपस्थिती होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.