Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : जामनेर मुक्ताईनगर मध्ये सेटलमेंट
    जळगाव

    मोठी बातमी : जामनेर मुक्ताईनगर मध्ये सेटलमेंट

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रOctober 31, 2024Updated:October 31, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्युज : जामनेर व मुक्ताईनगर मध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येलाच फटाके फुटले असून तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही अशा सांकेतिक शब्दात सेटलमेंट झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

    मुक्ताईनगर मतदारसंघात गुजर समाज मोठ्या प्रमाणात आहे याचा फटका मागच्या वेळेस 2019 ला आत्ताच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या ताईंना बसला होता. हा पुन्हा धोका होऊ नये म्हणून मुक्ताईनगर व जामनेर मध्ये अंतर्गत हात मिळवणे झाले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जामनेर तालुक्यात तुतारी चिन्हावर मराठा समाजाच्या शिक्षकाला घोड्यावर बसवले गेले आणि ऐन वेळेस जामनेर मध्ये माझा काही संबंध नाही अशा शब्दात सरांना सुनावले गेले.

    एकंदरीत मुक्ताईनगर ची जागा भाऊ तुम्ही घ्या आणि जामनेर ची जागा महाजन भाऊ तुम्ही घ्या अशा शब्दात हा लिखित करारनामा झाला असल्याचे समजते विशेष म्हणजे एका मोठ्या उद्योजकाने ही सेटलमेंट केली असल्याचे सांगण्यात आले.

    मुक्ताईनगर मध्ये भैय्या व जामनेर मध्ये सर हे वाऱ्यावर सोडले गेले असल्याचे चित्र आज तरी निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर चे भाऊ व जामनेर चे महाजन भाऊ यांच्यामधील या अंतर्गत सेटलमेंट मुळे मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याची पडसाद मुक्ताईनगर मतदार संघात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    तसेच जामनेर मध्ये देखील ही राजकीय घातकी सेटलमेंट अंग देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तूर्तास जामनेर मध्ये मुक्ताईनगर चे भाऊ दिसणार नाही आणि मुक्ताईनगर मध्ये जामनेर चे भाऊ दिसणार नाही प्रचारात किंवा सभांना आले तर मूग गिळून बसतील असे लिखित करा नामा झाल्या असल्याचे सांगण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    दक्षता पेट्रोलपंप घोटाळा : उपनिरीक्षक वाघांकडून मुलाच्या खात्यात 10 लाख; सोन्याची खरेदी उघड

    March 11, 2026

    चार वर्षीय चिमुकलीवर मामाने केला अत्याचार : संतप्त जमावाने रोखला महामार्ग !

    March 11, 2026

    जळगावातील हॉटेलात अत्याचार करीत केला गर्भपात !

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.