Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी चोरून सासऱ्याला विक्री ; दोन्ही अटकेत
    क्राईम

    दुचाकी चोरून सासऱ्याला विक्री ; दोन्ही अटकेत

    editor deskBy editor deskOctober 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    चार वर्षांपूर्वी चोरलेली दुचाकी सासऱ्याला विक्री करणाऱ्या तन्वीर मजीद पटेल (रा. खडका रोड, भुसावळ) याच्यासह त्याचा सासरा अशपाक सत्तार पटेल (रा. आक्सानगर, रा. जळगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करीत चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या.

    मिळालेली माहितीनुसार, मास्टर कॉलनीतील अशपाक सत्तार पटेल याच्याकडे चोरीची दुचाकी (एमएच १९, एक्यू ७८६३) असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने अशपाक पटेल याची विचारपूस केली असता, त्याने ही दुचाकी चार वर्षांपूर्वी त्याचा जावई तन्वीर मजीद पटेल याने आणून दिल्याचे सांगितले.

    त्यानुसार पथकाने तन्वीरचा शोध घेतला असता तो एका चोरीच्या दुचाकीवर फिरताना आढळला. दोन्ही दुचाकींविषयी चौकशी केली असता, आवेश बिसमिल्ला शेख (मणियार) (रा. खडका रोड, भुसावळ) याच्या मदतीने चार वर्षांपूर्वी चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी तन्वीर पटेल व अशपाक पटेल या दोघांना अटक करीत दोन दुचाकी हस्तगत केल्या. ही कारवाई पोउनि. दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेढे, कमलाकर बागुल, संघपाल तायडे, हरिलाल पाटील, गणेश गव्हाणे, विजय पाटील यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.