Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देवकर रूग्णालयात मिळाली 175 जणांना नवी दृष्टी
    आरोग्य

    देवकर रूग्णालयात मिळाली 175 जणांना नवी दृष्टी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सलग सातव्या गुरुवारी पंचवीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने 175 जणांना धुसर दृष्टीपासून मुक्त करून नव्या प्रकाशवाटा दाखवल्या.
    रुग्णालयातर्फे जानेवारी महिन्यापासून ना नफा ना तोटा तत्वावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविले जात असून, दर गुरुवारी रुग्णांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको (बिना टाक्याची) शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या गुरुवारी देखील 25 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी 75 टक्के रुग्णांनी फेको शस्त्रक्रियेला पसंती दिल्याचे दिसून आले. रुग्णालयात शस्त्रक्रियांचा हा सातवा आठवडाही हाउसफुल ठरला.

    गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता देवकर रुग्णालयाने ना नफा ना तोटा तत्वावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियान सुरू केले आहे. अभियानात आतापर्यंत 175 पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. केवळ 2500/-रुपयात मोतीबिंदू व केवळ सहा हजार रुपयात फेको (बिनटाक्याची) शस्त्रक्रिया केली जात आहे. रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
    संपर्क मो. 9370935252

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.