Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यातील लाडशाखीय वाणी समाजासाठी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाची मान्यता.
    चाळीसगाव

    राज्यातील लाडशाखीय वाणी समाजासाठी सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाची मान्यता.

    editor deskBy editor deskOctober 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील लाडशाखीय वाणी या जाती समुदायातील नागरिकांचे चाळीसगाव मतदारसंघात नुकतेच राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले आहे. सदर अधिवेशनात शासनाकडे त्यांनी विविध मागण्यांचे केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे बाबत मागणी करण्यात आली होती. याबाबत आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी तातडीने पावले उचलत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळासोबत भेट घेऊन निवेदन सादर केले होते.

    त्यावर मुख्यमंत्री यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याच्या बहुजन कल्याण विभागास दिले होते त्यानुसार आज दि.१० ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्यात लाडशाखीय वाणी समाजाची संख्या बहुसंख्य आहे.

    समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाचा हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार असून याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार, ग्राम विकास मंत्री गिरीशभाऊ महाजन, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुलजी सावे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे वाणी समाजातर्फे आभार मानण्यात आले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.