Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘पतीला घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करेल’ म्हणत विवाहितेला केले गर्भवती !
    क्राईम

    ‘पतीला घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करेल’ म्हणत विवाहितेला केले गर्भवती !

    editor deskBy editor deskOctober 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पती-पत्नीच्या वादाचा गैरफायदा घेत विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तरुणाने अत्याचार केला. यातून सदर विवाहिता गर्भवती राहिली असून तरुणाने ऐनवेळी लग्नास नकार दिला. हा प्रकार सन २०१८ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणी तुषार राजेंद्र आहिरे (२८, गोपाळपुरा) याच्याविरुद्ध ३ ऑक्टोबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात बाहेर गावाहून जळगावात आलेली एक २६ वर्षीय विवाहिता पतीसह राहते. सदर विवाहिता व तिचा पती यांचे नेहमी भांडण होत असल्याचा गैरफायदा घेत विवाहितेच्या ओळखीचा तुषार आहिरे याने ‘पतीला घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करेल’ असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून विवाहिता गर्भवती राहिली. विवाहितेने लग्नाचा आग्रह केल्यानंतर तरुणाने नकार दिला. याप्रकरणी विवाहितेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तुषारविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचे पडसाद : जळगावात भाजपने काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा !

    February 15, 2026

    “शिवरायांच्या नावावर राजकारण थांबवा” : सपकाळांचा भाजपला थेट इशारा

    February 15, 2026

    गॅस सिलिंडरचा स्फोट : तीन परिवाराचा संसार जळून खाक !

    February 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.