Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १० हजारांची लाच घेताना सरपंचासह पंटरला पकडले रंगेहाथ
    क्राईम

    १० हजारांची लाच घेताना सरपंचासह पंटरला पकडले रंगेहाथ

    editor deskBy editor deskSeptember 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आवास योजनेत मंजूर घरकूल नावावर करण्यासाठी लाभार्थ्याकडून १० हजारांची लाच घेताना खडकदेवळा, ता. पाचोरा येथील सरपंच व त्याच्या पंटरला रंगेहाथ पकडले. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, खडकदेवळा येथील सरपंच अनिल विश्राम पाटील (४६) आणि त्याचा पंटर बलराम हेमराज भिल (४६, रा. खडकदेवळा बु. ता. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी आहे. त्यांचे आवास योजनेतंर्गत घरकूल मंजूर झाले होते. परंतु ते राहत असलेल्या जागेला नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यात आलेले नव्हते. ते काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली होती. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. दहा हजारांची ही रक्कम सरपंचाने पंटरकडे देण्यास सांगितले. शुक्रवारी दुपारी ही रक्कम पंटरकडे देताच पथकाने त्याला अणि नंतर सरपंचालाही अटक केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.