Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सात गावठी कट्टे दहा जिवंत काडतूसह दोन अटकेत
    क्राईम

    सात गावठी कट्टे दहा जिवंत काडतूसह दोन अटकेत

    editor deskBy editor deskSeptember 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    चोपडा पोलिसांनी लासूर -हातेड रस्त्यावर दोन जणांकडून सात गावठी कट्टे आणि दहा जिवंत काडतूस जप्त केले आहे. या दोघांना पोलिसांनी दि. २० रोजी अटक केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, उमर्टी (मध्य प्रदेश) कडून दुचाकीवर येणाऱ्या मनोज राजेंद्र खांडेलकर (२४) रा.जुळेवाडी कराड ( सातारा), सागर सरणम रनसौरे (२४) रा.धायरी पुणे यांची चौकशी केली. त्यांच्या जवळ सात गावठी बनावटीचे कट्टे. दहा जिवंत काडतूस मिळून आले. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस राकेश पाटील, रावसाहेब पाटील, शशी पारधी, चेतन महाजन यांनी दि. २० रोजी दुपारी १२: ३० वाजे दरम्यान हातेड – लासूर रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ सापळा लावून ही कारवाई केली.

    दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा मुद्देमाल तसेच त्यांच्या ताब्यातील एक मोटार सायकल, दोन मोबाइल, सातशे रू. रोख असा एकूण दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. राकेश पाटील यांच्या फिर्यादिवरून आरोपींविरुद्ध आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्याच्या राजकारणात खळबळ: १७ रिक्त जागांसाठी निवडणूक, मेमध्ये आणखी ९ जागांचा फैसला

    April 16, 2026

    बांधकाम कामगार भांडी योजना लाभासाठी शंभर रुपयांची लाच!

    April 16, 2026

    नाशिक धर्मांतर-छळ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; ‘निदा खान’च मुख्य सूत्रधार !

    April 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.