Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गणेशपूजन केले तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली ; पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार !
    राजकारण

    गणेशपूजन केले तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली ; पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार !

    editor deskBy editor deskSeptember 20, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वर्धा : वृत्तसंस्था

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील वर्धा येथे आले असतांना त्यांनी या सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमधील देशभक्तीची भावना संपली आहे. परदेशातून बसून ते अजेंडा चालवतात. आता त्यांना गणपती बाप्पाचीही चीड येऊ लागली आहे. मी गणेशपूजन केले तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली होती, असा आरोप त्यांनी केला.

    महाराष्ट्रातील वर्धा येथील सभेत मोदींनी संबोधित केले. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. पंतप्रधान म्हणाले की, जुन्या सरकारमध्ये कामगारांच्या कौशल्याचा आदर केला जात नव्हता. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी एससी/एसटीला दडपून ठेवले. त्यांना पुढे जाऊ दिले नाही. आमच्या सरकारने कौशल्य मंत्रालयाची निर्मिती केली. पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत एका वर्षात 8 लाख लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.
    पीएम मोदी म्हणाले की, ज्या पक्षाला आपल्या आस्था आणि संस्कृतीचा किंचितही आदर आहे तो कधीच गणपती पूजेला विरोध करू शकत नाही. पण आजच्या काँग्रेसला गणपती पूजेचा तिटकारा आहे. मी गणेशपूजनाच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा काँग्रेसचे तुष्टीकरणाचे भूत उठले. काँग्रेसने गणपती पूजेला विरोध सुरू केला. वास्तविक, पंतप्रधान मोदी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजनासाठी गेले होते. ज्याला विरोधकांनी विरोध केला होता.

    पंतप्रधान म्हणाले – महाराष्ट्रात अनेक दशके काँग्रेस आणि नंतर महाविकास आघाडी सरकारने कापूस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ताकद बनवण्याऐवजी त्यांना संकटात ढकलले, शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केले आणि भ्रष्टाचार केला. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आल्यावर अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कचे काम सुरू झाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नशिबाला हरवून यशाला गवसणी; ममता नाकतोडेंची प्रेरणादायी भरारी !

    February 6, 2026

    होळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; काहींना चार हजार रुपयांचा लाभ

    February 5, 2026

    भरसभेतच उलट आदेश : “धनुष्यबाणाच्या उमेदवाराला मत नको” – शिंदेंच्या वक्तव्याने खळबळ

    February 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.