Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गावातीलच तरुणाने केला तरुणीवर अत्याचार
    क्राईम

    गावातीलच तरुणाने केला तरुणीवर अत्याचार

    editor deskBy editor deskSeptember 19, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणीला गावातील एकाने आपल्या घरी बोलावून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तरूणीच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या एका १९ वर्षीय तरूणीचा गत ८ महिन्यांपासून संशयित समाधान शेळके हा पाठलाग करत होता. तसेच कुणाला काहिही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी देत होता. दरम्यान, या तरूणीस आपल्या घरी बोलवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच कुणाला काही सांगितल्यास भाऊ व आई- वडीलांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच १६ सप्टेंबरला सायंकाळी समाधानने मद्य प्राशन करुन तरूणीचा हात पकडून ओढले. तेथे शेजारी उभ्या असलेल्या तरूणीच्या मामाने तिला सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना ही त्याने मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी तरूणीच्या फियार्दीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.