Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणाचा बुडून मृत्यू
    क्राईम

    गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणाचा बुडून मृत्यू

    editor deskBy editor deskSeptember 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्यात सर्वत्र लाडक्या बाप्पांना निरोप देत असतांना अनेक ठिकाणी दुर्देवी घटना घडल्या आहे. नाशिक येथील गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन महाविद्यालयीन युवकांचा इंदिरानगर येथील वालदेवी नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१८) सायंकाळी साडेसहा वाजता पाथर्डी शिवारातील नांदूर रस्ता परिसरात घडली. ओंकार चंद्रकांत गाडे (वय २३) व स्वयम मोरे (वय १८) अशी या युवकांची नावे आहेत. हे दोघेही पाथर्डी फाटा परिसरातील म्हाडा कॉलनीमधील रहिवासी आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मित्रांसोबत हे दोघे गणेश विसर्जनासाठी गेले होते. नदीपात्रात विसर्जन करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही नदीत बुडले. ते दिसानासे झाल्याने मित्रांनी त्यांचा पाण्यात शोध घेतला. मात्र ते अपयशी ठरले. त्यांनतर त्यांनी नातेवाईकांना याची माहिती दिली. नातेवाईकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ, माजी नगरसेवक भगवान दोंदे ,धनंजय गवळी, मदन डेमसे आदींनी घटनास्थळी जाऊन अग्निशामक दलाला सहकार्य केले. एका तासानंतर दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. ओंकार केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तर स्वयम संदीप फाऊंडेशनमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. या उमद्या मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अमळनेर हादरलं! खदाणीच्या ३० फूट खोल पाण्यात बुडून तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

    July 7, 2026

    कामाच्या ठिकाणी काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने १९ वर्षीय मुस्तकीमचा मृत्यू

    July 4, 2026

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’; सहकार क्षेत्रातील कार्याचा राज्यस्तरीय गौरव

    July 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.