Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात पिकविला गांजा ; संशयित अटकेत !
    कृषी

    तालुक्यातील शेतकऱ्याने शेतात पिकविला गांजा ; संशयित अटकेत !

    editor deskBy editor deskSeptember 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील भोकर गावातील रहिवासी शेतकऱ्याने चक्क कपाशीच्या शेतात गांजाची झाडं लावणाऱ्या प्रकाश सोनवणे या शेतकऱ्याच्या शेतात कारवाई करीत गांजाची २७ झाडं जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी तालुका पोलिसांनी भोकर-पळसोद शिवारात केली. या प्रकरणी शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, भोकर-पळसोद शिवारात गांजाची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून तालुका पोलिस शेतात पोहचले. शेतात कपाशीच्या पिकात गांजाचे २७ झाडं लावलेली आढळून आली. पोलिसांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, कृषी अधिकारी अमित भामरे, वजन मापे निरीक्षक अनंत पाटील यांना बोलवून खात्री करीत पंचनामा केला. ही झाडं जप्त करण्यात आली असून १२ किलो वजन व अंदाजे ४० हजार रुपये त्याची किंमत आहे. या प्रकरणी प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा, सपोनि अनंत अहिरे, पोउनि गणेश सायकर, नयन पाटील, पोहेकॉ दीपक चौधरी, बापू पाटील, किरण अगोणे, चेतन पाटील, प्रवीण पाटील, दिनेश पाटील यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.