Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भुकेल्यांसाठी तृप्तचा घास; बयस परिवाराचे कौतूक
    धरणगाव

    भुकेल्यांसाठी तृप्तचा घास; बयस परिवाराचे कौतूक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 27, 2022Updated:January 27, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील । शहरातील ज्योती देवी अन्नपुर्ण भंडार या सेवाभावी योजनेतून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ता भुकेल्यांसाठी खिचडीचे वाटप करण्यात आले. यासाठी बयस परिवाराने पुढाकार घेतला आहे.


    अधिक माहिती अशी की, धरणगाव येथे मुन्नादेवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलित ज्योती देवी अन्नपूर्ण भंडारच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सेवाशुल्क रुपये ५ मध्ये एक खिचडीची डिश मिळेल.

    या कार्यक्रमाचे अध्यक्ष धरणगावचे सुपुत्र आयकर आयुक्त विशाल मकवाने हे होते. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डी.आर. पाटील, काँग्रेसचे सचिव डी.जी. पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे, पोलीस निरीक्षक शेळके, जी जीनींगचे नयन गुजराथी, सुरेश नाना चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय शेठ पगारीया, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, ओबीसी सेलचे संजय महाजन आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

    बयस परिवाराचे कौतूक

    सर्व प्रमुख अतिथींनी भाषणामध्ये जीवन बयस व त्यांच्या परिवाराने या सेवाभावी उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
    या फाउंडेशनचे सर्वेसर्वा जीवन बयस यांनी आभार मानताना भावुक झाले. ते म्हणाले मी गरिबीही विसरलो नाही, गरीबी काय असते, जो भुकेला असतो, त्याला विचारावं, अन्नाची किमंत काय असते हे मी विसरु शकत नाही, अशीच प्रेरणा मला माझी पत्नी स्वर्गीय ज्योतीदेवी बयेस नेहमी द्यायची, म्हणून आई, वडील, काकु यांच्या संस्काराचा शिदोरीतुनच आज मी सेवा भावी काम करीत आहे.

    एक वर्षांपासून अन्न भंडारातुन ३० रूपयात पोटभर जेवण मिळते, ज्या लोकांना अपंगत्व मुळे, वयामानामुळे गरीब व गरजु लोकांना जाता येत नाही आशा लोकांना घरपोच डब्बे पोहचवण्यासाठी दररोज तजविज करीत असतात. आता ५ रूपयात खिचडी देणार आहेत, पुढचा याचा उपक्रम आहे तो म्हणजे युपीएससी व एमपीएससी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना साठी प्रशिक्षण वर्ग घेण्याचा मानस आहे.


    या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन जितेंद्र बयेस यांनी तर प्रास्ताविक धिरेन्द्र पुरभे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तेजेन्द्र चंदेल, मुकेश बयस, निखिल बयस, बाली बयस, मोहनीश चंदेल, यशपाल चंदेल, निलेश बयस, आबा वाघ, गोरख देशमुख, राजेंद्र ठाकुर, बिपीन भाटीया यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.