Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला अटक
    अमळनेर

    अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्याला अटक

    editor deskBy editor deskSeptember 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन संसार थाटणाऱ्या मांडळ येथील आरोपीला मारवड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात मारवड पोलिसात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    अल्पवयीन मुलगी बसने शिक्षणासाठी अमळनेर ये-जा करीत होती. तिची ओळख आरोपीसोबत झाली. त्यानंतर दि. १३ जून रोजी सकाळी ९ वाजता त्याने तिचे अपहरण केले. दोघेजण नागपूर आणि नंतर हैदराबाद येथे गेले. काही काळाने कोल्हापूर जिल्ह्यात नगाव येथे शेतीकाम करू लागले. अखेर पोलिसांनी त्यांना शिरोली, जि. कोल्हापूर येथील पोलिसांच्या मदतीने अटक केली. दोघांना मारवड येथे आणण्यात आले. मुलीच्या जबाबानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.