Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई व्हावी
    जळगाव

    महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई व्हावी

    editor deskBy editor deskSeptember 11, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे शहरात अपघातांच्या प्रमाण वाढलेले आहे. महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच बायपास व समांतर रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून कामास गती देण्यात यावी, अशी मागणी जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे.

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे जळगाव दौऱ्यावर आले आहेत. आ. राजूमामा भोळे यांनी राज्यपालांची भेट घेवून जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. यात जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवर होणाऱ्या अपघातांकडे त्यांनी राज्यपालांकडे लक्ष वेधले. तसेच जळगाव औद्योगिक क्षेत्रातील विद्युत वितरण विभागाच्या आरडीएसएस योजनेंतर्गत मंजूर प्रकल्पांच्या कामांना गती मिळावी, जळगाव शहरात नवीन औद्योगिक क्षेत्र उभारून, नवीन औद्योगिक प्रकल्प आणणे, जळगाव जिल्ह्यातील पतसंस्था ठेवीदारांना शासनामार्फत पॅकेज मंजूर करून ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

    जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, कोरोना काळात ज्या आशा सेविकांनी कार्य केलेले आहे, त्यांना सेवेत कायम करण्यात यावे, सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना वेतन वाढी संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही होणेसाठी आदेश द्यावेत अशा या मागण्या राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. यावेळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खासदार स्मिताताई वाघ, आ. लताताई सोनवणे, आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात भरवस्तीत डबल चोरी; बंद घरांचे कुलूप तोडून १.७८ लाखांचा ऐवज लंपास

    March 24, 2026

    पैशांच्या वादातून मित्राचा खून; रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव उघड !

    March 24, 2026

    किरकोळ कारणावरून संताप; आठ जणांच्या टोळक्याकडून तरुणावर निर्घृण हल्ला !

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.