Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आरपीएफ कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला, एक जखमी
    अमळनेर

    आरपीएफ कर्मचाऱ्यांवर चाकूने हल्ला, एक जखमी

    editor deskBy editor deskSeptember 7, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    आदल्या दिवशी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग आल्याने तिघांनी दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याने एक जखमी झाला. एक बचावला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलिस अधिकारी कुलभूषणसिंह चौहान यांनी दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, दि. ५ रोजी रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा चालकाला रेल्वे अभियंत्याचा वाहनाचा धक्का लागल्याचा आरोप करत रिक्षाचालक कार्यालयात गेला. त्यावेळी अभियंत्याने सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याला बोलावले हरेंद्र कुमार हा कर्मचारी पोहोचला. त्याने रिक्षा चालकाचा समाजवले. त्याचा राग आल्याने तीन जणांनी जीआरपी कार्यालयासमोरच दि. ६ रोजी दुपारी ३:३० वाजता हरेंद्र कुमारवर चाकुने हल्ला केला. त्यात हरेंद्र कुमारजखमी झाला. तसेच अर्जुन सिंग या अन्य आरपीएफ कर्मचाऱ्यावरही हल्ला केला. मात्र गणवेशातील बेल्टमुळे अर्जुनसिंग बचावले. यातील दोन आरोपींना रेल्वे पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. जखमी हरेंद्र यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.