Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भयंकर : आईचा मृतदेह पाहून मुलीनेही घेतली विहिरीत उडी
    क्राईम

    भयंकर : आईचा मृतदेह पाहून मुलीनेही घेतली विहिरीत उडी

    editor deskBy editor deskSeptember 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात आत्महत्याच्या घटना घडत असतांना नुकतेच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एका आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच मुलीनेही विहिरीत उडी मारत आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच अंत्यविधीसाठी निघालेल्या भावाचाही अपघात झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यामधील गल्ले बोरगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे पाहताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. यामुळे दुधारे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुधारे कुटुंब हे शेतात राहत होते. पल्लवीने रात्री सर्व कामे आटपल्यानंतर आईच्या हातावर मेहंदी काढली. यानंतर त्या दोघीही झोपल्या.

    यानंतर सकाळी उठल्यानंतर पल्लवीला तिची आई वंदना कुठेही दिसली नाही. तिने आजूबाजूला शोधाशोध केली. यानंतर ती आईला शोधण्यासाठी विहिरीजवळ गेली. त्यावेळी तिला आईचा तरंगलेला मृतदेह दिसला. यानंतर तिने कोणताही विचार न करता स्वत: विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या दोन्ही मायलेकींचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आई आणि बहिणीच्या निधनाचे वृत्त समजताच भाऊ वाल्मीक जनराव हे त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी निघाले होते. मात्र रस्त्यात त्यांचाही अपघात झाला. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान वंदना दुधारे आणि पल्लवी दुधारे यांनी आत्महत्या का केली? त्यामागचे कारण काय? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या मायलेकींच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.