Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये ७५ वा स्वातंत्र्य दिन” उत्साहात साजरा
    जळगाव

    गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये ७५ वा स्वातंत्र्य दिन” उत्साहात साजरा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 16, 2021Updated:August 16, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिरीन खाटीक यांनी भारताची महान संस्कृती व ऐतिहासिक परंपरा याचे वर्णन मनोज मुंतशिर यांच्या सुप्रसिद्ध कवितेतून केले. यामध्ये भारताच्या महान संस्कृतीचा प्राचीन इतिहास, अखंड राष्ट्र, परकीय आक्रमणे, वीर सुपुत्रांची भूमी, बलिदानाची परंपरा, स्वातंत्र्य संग्राम इ. विविध मुद्द्यांचा समावेश होता.
    याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, जेष्ठ शिक्षिका रिबेका फिलिप, भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, स्वाती भावे, ग्रीष्मा पाटील, पूनम कासार, शिरीन खाटीक, नाजुका भदाणे, पुष्पलता भदाणे, गायत्री सोनवणे, नाजनिन शेख, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड, अमोल सोनार हे शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, अमोल देशमुख, इंद्रसिंग पावरा हे शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुड शेपर्ड स्कुलच्या शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम’ ने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतिशय अस्खलित हिंदी मध्ये शिक्षिका शिरीन खाटीक यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.