Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एक नव्हे तर दोनदा केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; खान्देशात घडली घटना
    क्राईम

    एक नव्हे तर दोनदा केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; खान्देशात घडली घटना

    editor deskBy editor deskSeptember 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदूरबार : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर विनयभंग व अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच खान्देशातील नंदूरबार शहरात एका १४ वर्षीय मुलीचा दोन वेळा विनयभंग करत तिची छळवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीने आई-वडिलांसह उपनगर पोलिसात फिर्याद दिल्यानंतर संशयिताविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. कैलास काशीराम मोरे (४३) असे मुलीचा विनयभंग करणाऱ्या संशयिताचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी १४ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना कैलास याने तिला अश्लील हावभाव करत ‘मला घरात येऊ दे’ असे सांगितले होते. घाबरलेल्या मुलीने ही बाब शेजारी असलेल्या महिलेला सांगितल्यानंतर त्यांनी तिला धीर देत घराचा दरवाजा बंद ठेवण्यास सांगितले. मुलीचे पालक घरी आल्यानंतर त्यांनी याबाबत संशयित कैलास मोरे याला जाब विचारल्यानंतर त्याने विळा घेऊन धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी १४ वर्षीय पीडित मुलीने उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित कैलास काशीराम मोरे (४३) याच्याविरोधात विनयभंग आणि पोक्सो कायदा-कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करत आहेत. संशयितास पोलिसांकडून रविवारी रात्री ११.३५ वाजता अटक करण्यात आली. सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. उशिरापर्यंत न्यायालयात कामकाज सुरू होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.