Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार ; आ.खडसेंचे मोठे वक्तव्य !
    राजकारण

    मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार ; आ.खडसेंचे मोठे वक्तव्य !

    editor deskBy editor deskSeptember 2, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना नुकतेच ‘भारतीय जनता पक्षामध्ये आपला प्रवेश करण्यात यावा अशी विनंती आपण भाजपकडे केली होती. मात्र भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे, मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार,’ असे सर्वात मोठे विधान एकनाथ खडसे यांनी केले. यामुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

    राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ऐन लोकसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात घरवापसी करण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश झाला नाही. अश्यात त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचेच फोटो दिसत असल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे नाथाभाऊ नेमके कोणाचे? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

    याबाबत आता स्वतः एकनाथ खडसे यांनी मोठा खुलासा केला असून भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही, मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार आहे असे महत्वाचे विधान केले आहे. “भाजपामध्ये जाण्याची माझी इच्छा होती, माझ्या काही अडचणी होत्या, त्या मी जयंत पाटील यांना सांगितल्या होत्या. मात्र भाजपकडून प्रतिसाद मिळू शकला नाही, त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल. भाजपमध्ये नड्डा जी यांच्या उपस्थितीत माझा प्रवेश करण्यात आला, मात्र त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही,” त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नसल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.