Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फडणवीसांनी आघाडीला पकडले कोंडीत ; काँग्रेसला माफी मागण्यास लावणार का?
    राजकारण

    फडणवीसांनी आघाडीला पकडले कोंडीत ; काँग्रेसला माफी मागण्यास लावणार का?

    editor deskBy editor deskSeptember 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यभरात आज रविवारी महाविकास आघाडीकडून मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक शहरांत जोडे मारो आंदोलन झाले. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने आज महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अन् भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने शिवाजी महाराजांसंदर्भात काय, काय केले, त्याची उदाहरणे सांगत आता काँग्रेसला माफी मागण्यास लावणार का? असा प्रश्न विचारून थेट कोंडीत पकडले आहे.

    यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, पहिली गोष्ट तर उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरूंनी शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियात जे लिहिलंय त्याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्यप्रदेशात काँग्रेसने बुलडोझर लावून शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला त्यावर पवार ठाकरे मूग गिळून बसले आहेत. त्यावर का बोलत नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. आधी त्याचं उत्तर दिलं पाहिजे, असा हल्ला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    इतके वर्षे आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की महाराजांनी सुरत लुटली. परंतु खरा इतिहास तो नाही. महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर तो खजिना घेऊन योग्य त्या लोकांना दिला होता. हा स्वराज्याचा खजिना होता. त्यांनी आक्रमण केलं होतं. पण त्यांनी लूट कधी केली नव्हती. महाराज काही लूट करायला गेले नव्हते, पण असा इतिहास आम्हाला शिकवला गेला. इतकी वर्षे काँग्रेसने हा इतिहास शिकवला त्याची काँग्रेसला माफी मागायला सांगणार आहात की त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “डॉलरचे पार्सल” ठरले सापळा; भीती आणि आमिषाने ३.४७ लाखांची ऑनलाईन लूट

    April 21, 2026

    बीडमध्ये धक्कादायक प्रकार; सावत्र मुलासोबत महिला फरार

    April 20, 2026

    भाजपचे एक ‘दोन फुटांचा’ नेता ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !

    April 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.