Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गोलाणी मार्केटमधील व्यापाऱ्याला दीड लाखाचा ऑनलाईन चुना
    क्राईम

    गोलाणी मार्केटमधील व्यापाऱ्याला दीड लाखाचा ऑनलाईन चुना

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील गोलाणी मार्केटमधील एका व्यापाऱ्याला रास्त भावात माल देण्याचे आमीष दाखवत १ लाख ६० हजार ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकॉलनी येथील रहिवासी सचिन रंगनाथ देशपांडे (वय-४३) यांचे गोलाणी व्यापारी संकुलात व्यवसाय आहे. सचिन देशपांडे यांना भोपाळ येथील व्हेरटेक्स होम केअर इंडस्ट्रीजच्या अभिलाश शर्मा या मालकाने स्वस्त दरात माल पुरवण्याचे आमीष दाखवुन देशपांडे यांना १ लाख ६० हजार रुपये ऑनलाईन खात्यात वर्ग करण्याचे सांगीतले. १२ मार्च २०२१ ते २४ मे २०२१ दरम्यान पैसे वर्ग करुनही माल दिला नाही. याबाबत देशपांडे यांनी संपर्क साधला असता उडवा उडवीची उत्तरे देत होता. अखेर देशपांडे यांनी रविवारी २३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अभिलाश शर्मा याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहरपोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.श्‍

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.