Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शनीपेठ पोलिसांची कारवाई : शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलाकडे सापडली पिस्तूल
    क्राईम

    शनीपेठ पोलिसांची कारवाई : शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलाकडे सापडली पिस्तूल

    editor deskBy editor deskAugust 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रातिनिधी

    शहरातील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय परिसरातील जुना खेडी रोडवर गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला शनीपेठ पोलीसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळील जुना खेडी रोड वर एक अल्पवयीन मुलगा हा हातात गावठी पिस्तून घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरीष्ठ पोलीसांच्या आदेशानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किरण वानखेडे, पोहेकॉ विजय खैरे, विक्की इंगळे, योगेश साबळे, मुकुंद गंगावणे यांनी गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता कारवाई केली. यावेळी पोलीसांना पाहून अल्पवयीन मुलगा हा पळण्याच्या तयारीत असतांना शनीपेठ पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून गावठी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.