Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तीन पोलीस कर्मचाऱ्यामध्ये रस्त्यावर राडा ; चारचाकीने एकाला उडविले
    क्राईम

    तीन पोलीस कर्मचाऱ्यामध्ये रस्त्यावर राडा ; चारचाकीने एकाला उडविले

    editor deskBy editor deskAugust 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गणवेशात असलेले पोलिस दुपारपासून हॉटेलमध्ये दारु रिचवत असतांना त्यांच्यात वाद झाला. बाहेर येताच दारुच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या कर्मचारी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर कार पार्कीगमधून बाहेर काढत असतांना तेथील दुचाकींना धक्का दिला, त्यानंतर भरधाव वेगाने जात असतांना काही अंतरावर एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले. सुदैवाने सायकलस्वार मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही, ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलसमोर घडली. चक्क गणवेशावर असलेल्या पोलिसांमध्येच हाणामारी सुरु असल्याने रस्त्याने जाणाऱ्यांची रस्त्यावर थांबून होते.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये चार ते पाच पोलिस कर्मचारी गणवेशावर जॅकेट घालून त्याठिकाणी आले. दुपारच्या सुमारास त्यांनी दारु रिचवल्यानंतर ते त्याठिकाणाहून निघून गेले. मात्र काही वेळाने पुन्हा त्या हॉटेलमध्ये येवून पुन्हा मद्यपान करु लागले. सायंकाळपर्यंत दारु रिचवल्यानंतर त्यातील एक जण टुल्ल झाल्याने हॉटेलमध्ये त्यांच्याकडून दोन ग्लास फुटले. त्यानंतर ते सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हॉटेलबाहेर पडत असतांना त्यांच्यात कुठल्या तरी कारणावरुन वाद झाला. हॉटेलबाहेर आल्यानंतर पार्कीगच्याठिकाणी दारुच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची सुरु होती.

    दारुच्या नशेत तर्रर्रर्र झालेले पोलिस कर्मचारी पोलिसांचा लोगो असलेल्या (एमएच ०२, ईएच १०४८) क्रमांकाच्या कारमध्ये बसले. कार पार्कीगमधून बाहेर काढत असतांना त्यांनी दोन दुचाकींना धक्का देत पाडल्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार कशीतरी बाहेर काढून ते भरधाव वेगाने जात असतांना तेथून जाणाऱ्या एका कारचालकाला त्यांनी धडक दिली. यामध्ये सायकलस्वार मुलगा हा रस्त्यावर पडला, मात्र कार त्याठिकाणी न थांबता तेथून भरधाव वेगाने निघून गेली. या घटनेत सुदैवाने सायकलस्वाराला कुठलीही दुखापत झाली नाही.
    दारु रिचवतांना पोलिसांमध्ये सुरु असलेला वाद वाढून ते एकमेकांना भिडले. यामध्ये एक जण गणवेशावर असलेल्या पोलिसाच्या अंगावर धावून आला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी त्यांच्यात मध्यस्ती करीत अडविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांच्या धरपकड होवून एक जण रस्त्यावरील चिखलाच्या डबक्यात पडला यावेळी त्याचे संपुर्ण अंग चिखलाने माखलेले होते. दरम्यान, हे कर्मचारी जिल्ह्यातीलच असून ते जळगावात बंदोबस्तासाठी आल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरु होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.