Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेमविवाह केल्याने तरुणाला जबर मारहाण
    क्राईम

    प्रेमविवाह केल्याने तरुणाला जबर मारहाण

    editor deskBy editor deskAugust 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील खडका गावात प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणाला व त्याच्या पुतण्याचा रस्ता आडवून दोघांना बेदम मारहाण करून दुचाकीचे नुकसान केले. ही घटना रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील खडका परिसरात तुषार वासुदेव भोळे (वय ३२) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एक महिन्यापूर्वी तुषार भोळे याने प्रेमविवाह केलेला आहे. या रागातून रविवारी ११ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास तुषार भोळे दुकानावर बसलेला असताना गावात राहणारा सागर दगडू पाटील याने तुषारला फोन करून शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर तुषार हा पुतण्यासोबत दुचाकीने घरी जात असतांना सागर पाटील व इतरांनी दोघांना बेदम मारहाण करून त्यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केली. या घटनेबाबत तुषार भोळे यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

    तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर दगडू पाटील, पवन मंगलसिंग पाटील, योगेश सुपडूसिंग महाजन, मनिष कमलाकर धांडे, तेजबहादुरसिंग सरेंद्रसिंग पाटील, विशाल सामसिंग पाटील, रजत नानासिंग पाटील, पृथ्वीसिंग राजेंद्रसिंग पाटील, प्रशांत रामसिंग पाटील, सुरेंद्रसिंग नारायणसिंग पाटील, अरुणसिंग नारायणसिंग पाटील, राजेंद्रसिंग नारायणसिंग पाटील, शारदा राजेंद्रसिंग पाटील आणि श्यामसिंग पंचमसिंग पाटील सर्व रा. खडका ता. भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शुल्लक कारणाने पती-पत्नीस मारहाण ; पोलिसात गुन्हा दाखल !

    April 20, 2026

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.