Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातील पाच अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर
    जळगाव

    जिल्ह्यातील पाच अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर

    editor deskBy editor deskAugust 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांना गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये सेवा केल्याबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. विशेष सेवा पदक मिळणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शनिपेठ पोलीस ठाण्याचे रंगनाथ धारबळे, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे उद्धव डमाळे, पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस मुख्यालयातील सपोनी नीलेश वाघ यांचा समावेश आहे.

    चोपडा येथे कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल ऑपरेशनदरम्यान केलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. सोनवणे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे २०१९ ते २०२१ यादरम्यान नक्षली चकमकींना चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर सोनवणे यांनी फैजपूर येथे काम पाहिले. सध्या ते चोपडा येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वीही केंद्रीय गृह विभागाच्या वतीने अंतर्गत सुरक्षा पदक, खडतर सेवा पदक, पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह असे पुरस्कार मिळाले आहेत.

    जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झाले आहे. ३ ऑगस्ट २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या काळात ते जळगावचे पोलिस अधीक्षक होते.

    जळगाव जिल्हा पोलिस दलात केलेल्या विशेष सेवेबद्दल सहाय्यक फौजदार देविदास वाघ यांना २०२२-२०२३ या वर्षासाठीचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. सन १९९१मध्ये पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेले वाघ सध्या धुळे जिल्ह्यात सहायक फौजदार म्हणून काम पाहत आहे. ३४ वर्षांच्या सेवेत त्यांना चार पदकं मिळाले आहेत. जळगावातील शनिपेठ, जळगाव शहर पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालयात प्रशिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. तसेच नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीतील प्रशिक्षण केंद्रात ११ ‌वर्षे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. २०२१-२२ या वर्षात क्यूआरटीच्या जवानांनाही त्यांनी प्रक्षिक्षण दिले. त्यांना आतापर्यंत पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह, केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट प्रक्षिक्षक पदक, राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहे. आता राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.