Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिवाजी नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
    क्राईम

    शिवाजी नगरातील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको परिसरात तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    याबाबत माहिती अशी की, समीर रामदास बांदल (वय-३२) रा. शिवाजीनगर हुडको हा तरूण वडील, पत्नी, भाऊ व दोन मुलींसह वास्तव्याला आहे. गेल्या दीड महिन्यांपुर्वीच समीर हा पुण्याला नोकरी लागली होती. मंगळवारी १८ जानेवारी रोजी समीरच्या चुलत भावाच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तो जळगावात घरी आला होता. दरम्यान २० जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास समीर घरी एकटा असतांना त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. समीरचे वडील रामदास बांदल हे कामावरून घरी आल्याने हा प्रकार उघडकीला आला आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजून आले नाही. समीरची पत्नी दोन मुलींसह दोन महिन्यांपासून माहेरी गेलेल्या होत्या. चुलत भाऊ विजय लक्ष्मण बांदल यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.