Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » म्हसावद ते विटनेर रस्त्यावर ‘हिट ॲण्ड रन’चा थरार : महिलेसह दुचाकीस्वाराला उडविले !
    क्राईम

    म्हसावद ते विटनेर रस्त्यावर ‘हिट ॲण्ड रन’चा थरार : महिलेसह दुचाकीस्वाराला उडविले !

    editor deskBy editor deskAugust 12, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भरधाव कारने पादचारी महिला व दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. त्यानंतर ही कारहीदेखील रस्त्याच्या कडेला उलटली. यामध्ये महिला व दुचाकीस्वारासह कारमधील दोघे असे एकूण चार जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री म्हसावद ते विटनेर दरम्यान घडली. संबंधित कारचालकाने एकाला कट मारला होता, त्यामुळे पाठलाग करणाऱ्यापासून बचाव करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याने पादचारी महिलेसह दुचाकीला धडक दिल्याचे समजते.

    मिळालेल्या माहितीनुसार, म्हसावदकडून नेरीकडे जाणाऱ्या कारने (क्र. एमएच १५, सीडी ८१९४) एकाला कट मारला होता; त्यानंतर कुणी पाठलाग करेल या भीतीने कारचालकाने आपली कार दामटली. ही कार भरधाव वेगाने वावडद्याकडे निघाली असता या ठिकाणी सुनबाई भिका राजपूत ही महिला रस्ता ओलांडत असताना कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्या उंच फेकल्या गेल्या.

    महिलेला उडविल्यानंतर गावकऱ्यांनी या कारला अडविण्याचा प्रयत्न केला मात्र कारचालक न थांबता भरधाव निघून गेला. त्यामुळे गावकऱ्यांनी विटनेर येथील ग्रामस्थांना माहिती दिली. तेथे रस्त्यावर बैलगाडी आडवी लावून कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता कारचालक वळून मागे आला व पुन्हा वावडद्यानजीक पप्पू कदम राठोड (रा. रामदेव वाडी) या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. कारचालकाला अडविण्यासाठी वावडदा गावातील ५० ते ६० जण रस्त्यावर थांबले होते; मात्र तरीदेखील कारचालकाने न जुमानता कार भरधाव वेगाने नेली. कार रस्त्याच्या कडेला उलटल्यानंतर याच नागरिकांनी कारमधील दोघांना बाहेर काढून रुग्णालयात हलविले, जखमींची नावे कळू शकलेली नाहीत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.