Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील हॉटेलात राडा : पोलीस कर्मचारीसह होमगार्डला जबर मारहाण
    क्राईम

    जळगावातील हॉटेलात राडा : पोलीस कर्मचारीसह होमगार्डला जबर मारहाण

    editor deskBy editor deskAugust 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि होमगार्ड हे जेवणासाठी शिवकॉलनीजवळील एका हॉटेमध्ये गेले होते. त्यांच्या समोरील टेबलावर बसलेल्यांना पोलिस कर्मचाऱ्याने हळू बोला असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्यांच्यामध्ये तुफान राडा झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. यावेळी टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याजवळ दुखापत झाली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रारीची नोंद करण्यात आली असून जखमी पोलिस कर्मचाऱ्यासह होमगार्डवर खासगी रुग्णालयात उपचार सुर आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपुर्वी जून्या वादातून कालिंका माता चौफुली परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेलमध्ये तरुणाचा निर्घण खून केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांनाच रात्री उशिरापर्यंत महामार्गात सुरु असलेल्या शिवकॉलनी जवळील हॉटेल स्वाद येथे रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी नितेश बच्छाव होमगार्ड शरद साळवे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. यामध्ये रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी बच्छाव हे होमागार्डसोबत शिवकॉलनीजवळील हॉटेल स्वाद येथे जेवणासाठी गेले होते. ते ज्याठिकाणी जेवणाला बसले त्या समोरील टेबलावर काही जण दारु पित होते. त्यांच्यात मोठमोठ्या बोलणे सुरु असल्याने त्याचा त्रास पोलिस कर्मचाऱ्याला झाला.

    जेवणासाठी गेलेल्या पोलिसाने त्या टोळक्याला हळू बोला असे खडसावून सांगितले. मात्र तरी देखील त्यांच्याकडून गोंधळ केला जात असल्याने होमगार्ड हा त्या टोळक्याच्यास टोळक्याने पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांना बेदम मारहाण करीत जखमी केले. तसेच त्यांच्या डोक्यात खुर्च्छा टाकल्याने पोलिस कर्मचाऱ्याच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.