Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बसमध्ये चढत असतांना शेतकऱ्याच्या खिशातून ३५ हजार लांबविले
    क्राईम

    बसमध्ये चढत असतांना शेतकऱ्याच्या खिशातून ३५ हजार लांबविले

    editor deskBy editor deskAugust 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना, शेतकऱ्याच्या खिशातून ३५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शालीग्राम तुकाराम पाटील (वय ६५, रा. सामरोद, ता. जामनेर) हे बुधवारी जळगाव शहरात कामानिमित्त आले होते. दुपारी काम संपल्यानंतर, २.३० वाजता जळगाव बसस्थानकात आले. त्याठिकाणाहून दुपारी ३ वाजता जामनेर बसमध्ये चढत असताना, त्यांच्या खिशातून ३५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवून नेली. बसमध्ये बसल्यानंतर खिशातील रक्कम चोरून नेल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी बसमधून उतरून थेट जिल्हा पेठ पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी शालीग्राम पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.