Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » Breaking : राज्यात सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार
    राज्य

    Breaking : राज्यात सोमवारपासून शाळेची घंटा वाजणार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

    मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून पासून २४ जानेवारी रोजी पासून कोरोना संसर्ग कमी असलेल्या भागातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर बाबी पाहून स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकणार आहेत. राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समंती दिली असल्याचे वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

    शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड बोलताना म्हणाल्या की, “सर्वच स्तरांतून शाळा सुरु करण्याच्या संदर्भात मागणी होत होती. तसेच, शाळा सुरु करण्यासंदर्भातील अधिकार स्थानिक स्तरावार देण्याची मागणी होत होती. अशातच आजच्या बैठकीत सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सोमवारपासून म्हणजेच, 24 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती असणे आवश्यक असल्याचे देखील यावेळी वर्षा गायकवाड यांनी बोलतांना नमूद केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धार्मिक यात्रेवरून परतताना काळाचा घाला : जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

    April 18, 2026

    इन्स्टाग्रामच्या आडून तरुणींचे शोषण: ‘ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनलो’ : मुख्य आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.