Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ताकदीने मैदानात उतरा, सर्व जागा आपल्या महायुतीच्या येणार ; उपमुख्यमंत्री फडणवीस !
    राजकारण

    ताकदीने मैदानात उतरा, सर्व जागा आपल्या महायुतीच्या येणार ; उपमुख्यमंत्री फडणवीस !

    editor deskBy editor deskAugust 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला. तुम्ही निराश होऊ नका, मी तीन महिन्यांत महाराष्ट्रात आपली सत्ता आणतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितले. ते नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार आणण्याचा विश्वास व्यक्त केला.

    आपला प्रॉब्लेम झाला तो म्हणजे 2014 नंतर आपल्याला जिंकायची सवय लागली. त्यामुळे एक निवडणूक हरली तरी कार्यकर्ते खचतात, निराश होतात. पण कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे वागणे सोडावे, आता मी तीन महिन्यात आपले सरकार आणतो. आपली लढाई रयतेचा राज्य आणण्यासाठी आहे. त्यासाठी तुम्ही ताकदीने मैदानात उतरा, सर्व जागा आपल्या महायुतीच्या येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील झालेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा पाढाही वाचला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना आणली. त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. नागपूर जिल्ह्यात विकासाची गंगा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आम्ही आणली. नळ गंगा योजना आम्ही आणली, त्याला पुढच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळेल. मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आपण विदर्भात आणली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला.

    लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत काम करण्याचा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्यांनी म्हटले की, आपले कार्यकर्ते काम चांगले करतात. मात्र, विरोधकांप्रमाणे आपण मार्केटिंग करत नाही, आता आपली काम तुम्ही दाखवा. हे लोक एवढे हुशार आहे ते निवडणुकीपुरत्या घोषणा करतात, मार्केटिंग करतात. त्यामुळे आता तुम्ही देखील आपले मार्केटिंग करा, आपले काम जनतेला दाखवा. अनेक कार्यकर्ते थकले होते , चालते तर चालू द्या, अशा मनोवृत्तीने काम करत होते. अनेक चमकेश कार्यकर्ते आपल्याकडे आहेत, ते कॅमेरा पाहून काम करतात ते आता विसरा, अशी तंबीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026

    भररस्त्यात पोलिसाला थप्पड; मद्यधुंद दांपत्याचा सिग्नलवर राडा !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.