Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी मित्राला शेवटचा फोन करत तरुणाने आयुष्य संपविले !
    क्राईम

    फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी मित्राला शेवटचा फोन करत तरुणाने आयुष्य संपविले !

    editor deskBy editor deskAugust 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    फ्रेण्डशिप डे’च्या दिवशी एका तरुणाने आपल्या मित्राला फोनवर ‘मित्रा माझा हा तुला शेवटचा फोन आहे, यापुढे माझा तुला कधी फोन येणार नाही. मी तुला पुढे त्रास देणार नाही’… असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे. किरण रमेश शिंपी (वय २२, रा. शिंदी, ता. भडगाव, ह.मु, रामेश्वर कॉलनी) असे मयत तरुणाचे नाव आहे. किरण शिंपी हा तरुण आई, भाऊ आणि वहिनीसोबत भडगाव तालुक्यातील शिंदी येथे वास्तव्याला होता.

    सविस्तर वृत्त असे कि, गेल्या अडीच वर्षांपासून तो जळगाव शहरातील एमआयडीसीतील एका ठिबक कंपनीत कामाला होता. तसेच रामेश्वर कॉलनीत एका भाड्याच्या रूममध्ये तो वास्तव्याला होता. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता किरणने त्याचा कंपनीतील मित्र रवी मधाळे याला फोन केला. यावेळी बोलताना किरणने, आता तुला मी कधीही त्रास देणार नाही. आता हे आपलं शेवटचं बोलणं’ असल्याचे सांगितले.

    त्यावर रवीने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यासह सोमवारी सकाळी भेटू असे म्हणत फोन कट झाला. त्यानंतर किरणने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी घर मालकीणीने घरात डोकावून पाहिले असता त्यांना किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.