Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चार महिन्यापूर्वी लग्न, विवाहितेचा खून ; पतीसह तीन जण ताब्यात
    क्राईम

    चार महिन्यापूर्वी लग्न, विवाहितेचा खून ; पतीसह तीन जण ताब्यात

    editor deskBy editor deskAugust 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    गेल्या चार महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या पत्नीला घरगुती वादातून लाकडी दांड्याने मारहाण करत पतीने ठार केले. ही घटना जामनेर तालुक्यातील गोद्री येथे रविवारी रात्री घडली. सोमवारी सकाळी या महिलेचे नातेवाईक गोद्री येथे पोहोचले त्यावेळी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. विशाल चव्हाण नावाच्या पतीसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, काजल चव्हाण (१८, रा. गोद्री, ता. जामनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. मुसळी फाटा (ता. धरणगाव) येथे तिचे माहेर आहे. यंदा २८ एप्रिल रोजी तिचा विवाह विशाल याच्याशी झाला होता. रविवारी रात्री पती-पत्नीत घरगुती वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन विशालने काजलच्या तोंडावर व नाकावर लाकडी दांड्याने मारहाण केली. यातच तिचा मृत्यू झाला. काजलच्या वडिलांना कुणीतरी फोन करून या घटनेची माहिती दिली. ते सोमवारी सकाळी जामनेरात पोहोचले. त्यावेळी ही खुनाची घटना उघडकीस आली.
    काजलचे वडील जयसिंग सुकलाल चव्हाण (४३, रा. मुसळी फाटा, ता. धरणगाव) यांच्या फिर्यादीत आपण ५० हजार रुपये दिले नाहीत म्हणून पतीने तिचा खून केला असे म्हटले आहे. याबाबत पती, सासू, सासरे अशा तीन जणांविरुद्ध फत्तेपूर पोलिस ठाण्यात बीएनएस कलम १०३ (१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहिल्याच दिवसापासून कामाचा वेग! प्रभाग १३ साठी वैशालीताई पाटील मैदानात

    February 6, 2026

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.