Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उसनवारीच्या पैश्याचा वाद : तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
    क्राईम

    उसनवारीच्या पैश्याचा वाद : तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

    editor deskBy editor deskAugust 4, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    उसनवारीच्या पैसे मागितल्याच्या कारणावरुन अविनाश किशोर जोशी वय २५, रा. संजय गांधी नगर, या तरुणावर चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना दि. २ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास जोशी कॉलनीत घडली होती. याप्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी विजय उर्फ भूरा मधुकर जोशी या संशयिताला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे दोन साथीदार फरार असून त्यांच्या मागावर पथक रवाना झाले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, संजय गांधी नगरात अविनाश जोशी हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळील विजय उर्फ भूरा जोशी याने अविनाश जोशी याच्याकडून २० हजार रुपये उसनवारीने घेतले होते. शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अविनाश उर्फ भूरा जोशी हा घरासमोर उभा असतांना, अविनाश याने त्याच्याकडे उसनवारीच्या पैशांची मागणी केली. यावेळी भुरा जोशी हा अविनाश याला शिवीगाळ करु लागला.

    याचवेळी भुरा जोशी याचा भाऊ सचिन जोशी, त्याचा मुलगा हर्षल व पुष्पा जोशी त्याठिकाणी आले. ते देखील अविनाश सोबत वाद घालू लागले, या वादात हर्षल जोशी याने त्याच्याजवळील धारदार चाकूने अविनाशच्या पोटावर आणि छातीवर वार केले. त्यानंतर सर्वजण तेथून पसार झाले. परिसरातील काही तरुणांनी जखमी अवस्थेत असलेल्या अविनाशला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याने दिलेल्या जबावारुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.