Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘त्या’ अपघातातील जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    ‘त्या’ अपघातातील जखमी तरुणाचा दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskAugust 2, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतीनिधी

    तालुक्यातील पहूर कसबे येथील युवक गणेश ज्ञानेश्वर बनकर (२७) याचा बुधवारी नेरी, ता. जामनेर येथे जात असताना अपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. गुरुवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची बातमी पहूर गावात धडकली. घरातील कर्ता मुलगा व एका चिमुरड्याचे पितृछत्र हरपल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, पहूर कसबेतील रहिवासी ज्ञानेश्वर बाळकृष्ण बनकर यांचा चिरंजीव गणेश ज्ञानेश्वर बनकर हा जळगाव येथे कामाला आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी घरून दुचाकीने जळगावला जाण्यासाठी तो निघाला. जळगाव-छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर नेरी येथे श्वानामुळे दुचाकीला अपघात झाला. यात गणेश याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी त्याच्या मृत्यूची बातमी गावात येऊन धडकली.
    गणेश हा घरचा कर्ता मुलगा होता.

    घरी तीन ते चार एकर जमीन असल्याने वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. दररोज जळगाव येथे गणेश कामासाठी येत होता. त्याच्या अकाली मृत्यूने परिवार उघड्यावर आला असून त्याच्या चार वर्षांच्या चिमुरड्याचे पितृछत्र हरपले आहे. पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पहिल्याच दिवसापासून कामाचा वेग! प्रभाग १३ साठी वैशालीताई पाटील मैदानात

    February 6, 2026

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.