Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एकतर्फी प्रेमातून मुलीच्या गळ्यावर चाकूने वार ; नागरिकांची तरुणाला मारहाण
    क्राईम

    एकतर्फी प्रेमातून मुलीच्या गळ्यावर चाकूने वार ; नागरिकांची तरुणाला मारहाण

    editor deskBy editor deskAugust 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच अमरावती शहरातील राजापेठ भागात सकाळच्या सुमारास एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने एका १७ वर्षीय मुलीच्या गळ्यावर चाकूने वार करीत तिचा गळाच चिरल्याची धक्कादायक घटना घडली असून या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने मुख्य चौकात ही घटना घडत असताना एक ऑटोचालक आणि इतर नागरिकांनी धाव घेत तत्काळ तरुणीची सुटका केली आणि माथेफिरू तरुणाला बेदम बदडून काढीत पोलिसांच्या हवाली केले.

    सविस्तर वृत्त असे कि, बुधवारी सकाळी झालेल्या या हल्ल्यात मुलीचा गळा चिरल्याने तिच्यावर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रफुल्ल मुकुंद कळस्कर (२३, रा. राजापेठ, अमरावती) असे अटकेतील हल्लेखाराचे नाव आहे. पीडित मुलगी मैत्रिणीसह घरून राजापेठ भुयारी मार्गाने महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. भुयारी पुलाखालून राजापेठ मुख्य चौकात उड्डाणपुलाखाली ती येताच प्रफुल्लने तिला खाली पाडले व जवळचा चाकू काढून गळ्यावर वार केला. यावेळीऑटोचालक व नागरिकांनी तत्काळ धाव घेवून प्रफुल्लला पकडले, त्याच्या हातातील चाकू घेवून त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्यानंतर चोप दिला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून हल्लेखाराला ताब्यात घेतले. दरम्यान राजापेठ पोलिसांनी जखमी मुलीच्या तक्रारीवरुन प्रफुल्ल कळस्करविरुध्द जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

    प्रफुल कळस्कर हा मागील काही महिन्यांपासून या अल्पवयीन मुलीस त्रास देतो आहे. त्याने छेड काढण्याप्रकरणी मार्च महिन्यात मुलीच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुध्द विनयभंग व पोस्कोच्या कलमान्वये राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.