Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ओला दुष्काळाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले आयुष्य
    अमळनेर

    ओला दुष्काळाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले आयुष्य

    editor deskBy editor deskAugust 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील वाघोदे येथील ईश्वरलाल चिंधा पाटील (वय ४६) या शेतकऱ्याने शेतीमुळे झालेले कर्ज व यावर्षी ओल्या दुष्काळी परिस्थितीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घटना ३० रोजी घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरलाल पाटील यांनी २७ रोजी घरीच विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना धुळे येथे उपचारार्थ हलवण्यात आले. होते. उपचारादरम्यान ३० रोजी तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असून घरातील कमावता व्यक्ती गेल्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्यावर विकास सोसायटी आणि सहकार सोसायटी तसेच इतर हात उसनवारीचे कर्ज होते. या कुटुंबास त्वरित शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मयत ईश्वरलाल पाटील यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, मुलगा असा परिवार आहे. या घटनेबाबत धुळे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.