Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सराईत गुन्हेगाराची काढली मिरवणूक : पोलिसांनी पुन्हा केली अटक
    क्राईम

    सराईत गुन्हेगाराची काढली मिरवणूक : पोलिसांनी पुन्हा केली अटक

    editor deskBy editor deskJuly 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्यातील गुन्हेगारांची भाईगिरी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना पोलीस प्रशासन देखील त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. नुकतेच नाशिकमध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर शाही मिरवुक काढणे गुंडाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांकडून याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मिरवणूक काढल्याबद्दल पोलिसांकडून गुंडाला चांगलाच दणका देण्यात आला आहे. मिरवणुकीत चारचाकी गाडी चालवणाऱ्या चालकाला अटक करण्यात आली आहे. शिवाय ती चारचाकी सुद्धा जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने शरणपूर भागात बेकायदा मिरवणूक काढणाऱ्या गावगुंडांच्या उन्मादाला नाशिक पोलिसांनी दणका दिला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद पाटणकर हा एमपीडीए अंतर्गत नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जेरबंद होता. त्याची नुकतीच कारागृहातून सुटका करण्यात आली होती. हर्षदची सुटका होताच त्याच्या समर्थकांकडून त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. शरणपूर रोड परिसरात त्याची जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. या मिरवणुकीची व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.
    विशेष म्हणजे, या मिरवणुकीत सराईत गुन्हेगार, तडीपार गुंड आणि टवाळखोरांचाही सहभाग दिसून आला होता. आलिशान गाड्यांचा वापर करत शरणपूर रोडवरील बैथेल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी रोड, शरणपूर रोड परिसरातून हर्षद पाटणकरची मिरवणूक काढण्यात आली.

    मिरवणुकीतील सहभागी झालेले टवाळखोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत व्हिडिओमध्ये दिसून आले होते. टवाळखोरांकडून बॉस इज बॅकच्या घोषणाही दिल्या गेल्या. आता या प्रक्ररणाची नाशिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

    नाशिक पोलिसांकडून मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी, दहशत माजविल्याप्रकरणी हर्षद पाटणकर विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हर्षद पाटणकरला पुन्हा एकदा कारागृहात पाठवले आहे. दरम्यान, हर्षद पाटणकर हा सराईत गुंड असून त्याच्याविरोधात सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर या पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात जबर दुखापत, चोरी, घरफोडी, शिवीगाळ व दमदाटी, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.