Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिरसोली येथील विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या
    क्राईम

    शिरसोली येथील विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 19, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शिरसोली येथील २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी (वय-२२) रा. शिरसोली प्र.न. ता.जि.जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता अजय बारी ह्या पती अजय अशोक बारी यांच्यासह वास्तव्याला आहे. अजय बारी हा खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरी करत असून आठवड्याचे तीन ते चार दिवस बाहेरगावी राहतात. विवाहितेच्या सोबत सासू, सासरे, जेठ व जेठाणी हे राहतात. प्राजक्ता या विवाहितेने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री साडीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी विवाहितेच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच आक्रोश केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.