Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भजनी मंडळ साहित्याचे वाटप
    जळगाव

    मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते भजनी मंडळ साहित्याचे वाटप

    editor deskBy editor deskJuly 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पंढरपूरची आषाढीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी 4 हजारापेक्षा भाविक भक्तांना दर्शनाला पाठविता आल्याचे भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले. पांडुरंगाच्या कृपेने आणि वारकऱ्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात आम्ही काम करत राहणार असून संत कार्यासाठी सदैव झटत राहणार असून ‘राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान’ हे महत्त्वाचे असते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. श्रीगुरु मोठे बाबा वारकरी सेवा टस्ट्र आयोजित पाळधी येथील सुगोकी लॉन्सवर आयोजित भजनी मंडळ साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे सूक्ष्म नियोजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मित्र परिवाराने केले होते. या अत्यंत शिस्तबद्ध व अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव व जळगाव तालुक्यातील 79 भजनी मंडळांना आज साहित्याचे वाटप करण्यात आले.

    ग्रामीण भागात भजन, किर्तन, हरिनामाचा सप्ताह असे विविध कार्यक्रमाच्या माऊलींच्या हरिनामाचा गजरासाठी भजनी मंडळ साहित्याची खूप गरज असते हिच गरज ओळखुन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 57, दुसऱ्या टप्प्यात 41 आणि आज तिसऱ्या टप्प्यात 79 असे एकूण 177 गावांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले.
    प्रस्ताविकात माजी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की संतांचा वारसा टिकविण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत असून त्यांना सहकार्य म्हणून तीन टप्यात आतापर्यंत 177 भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या वारकरी सांप्रदायाला सदैव सहकार्य राहणार असल्याची ग्वाही प्रतापराव पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन ह.भ.प. प्रा. सी एस पाटील यांनी केले. आभार सुशील महाराज विटनेरकर यांनी मानले.

    याप्रसंगी, ह.भ.प. चतुर्भुज महाराज धरणगावकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज आवरकर ह.भ.प. शाम महाराज शास्त्री पिंपळगावकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प. सुशील महाराज विटनेरकर, ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, कैलास महाराज चोपडाईकर, ह.भ.प. बाबा हंस महाराज, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, जिल्हा प्रमुख निलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, शाळेचे चेरमन विक्रम पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, अर्जुन पाटील, शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, दिलीप आगीवाल, मा. सभापती प्रेमराज पाटील, अनिल पाटील, रविंद्र चव्हाण सर, सचिन पवार, कैलास पाटील भरत बोरसे, गजानन पाटील, दुध संघाचे रमेश आप्पा पाटील, जितू पाटील, राजू पाटील, स्वप्नील परदेशी, भानुदास विसावे, परिसरातील सरपंच तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व सरपंच, वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

    March 20, 2026

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    March 20, 2026

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.