Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : दोन चोरट्यांना घेतले ताब्यात !
    क्राईम

    एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : दोन चोरट्यांना घेतले ताब्यात !

    editor deskBy editor deskJuly 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    मध्यरात्रीच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हाफकिन अजिंठा फार्म- सुटिकल्स कंपनीतून १७ किलो तांब्याचे पाईप चोरणाऱ्या ज्ञानेश्वर रतन सोनार (वय २५) व विनोद गोपाळ मोरे (वय २२) यांना अटक केली होती. ते पाईत विकत घेणाऱ्या शेख सईद रफिक शहा (वय ५३, रा. रजा कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरातील हाफकिन अजिंठा फार्मसुटिकल्स लि. कंपनीतून सुमारे १८० फुट लांब १७ किलो वजनाची ६३ हजारांची तांब्याची पाईपलाईन चोरी झाल्याची घटना दि. २० जुलै रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी ज्ञानेश्वर सोनार, गोपाळ मोरे यांनी दोन अल्पवयीन बालकांच्या मदतीने केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार अल्पवयीन मुलांसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, ते चोरलेले पाईप रामनगरातील भंगार व्यावसायीक शेख सईद रफिक शहा याला विकल्याचे चोरट्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी भंगार व्यावयीकाला देखील ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेले पाईप देखील हस्तगत करण्यात आले आहे. अटकेतील तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

    यांनी केली कारवाई
    ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहेकॉ सचिन मुंढे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, साईनाथ मुंढे, ललित नारखेडे, किरण पाटील, छगन तायडे यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटनेवरून राज्यात खळबळ; कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक

    February 27, 2026

    कार्यक्रमावरून परतताना अपघात; खा.संजय देशमुखांच्या वाहनाचा अपघात !

    February 27, 2026

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.