Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुख्यमंत्री शिंदेंची रणनिती : 110 जागा लढविण्याच्या तयारीत
    राजकारण

    मुख्यमंत्री शिंदेंची रणनिती : 110 जागा लढविण्याच्या तयारीत

    editor deskBy editor deskJuly 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुंबईमध्ये विनाकारण फिरण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून कामे करा, आपल्या वक्तव्यामुळे महायुतीत बेबनाव होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या, अशा सूचना करतानाच जागावाटपात मतदारसंघांची अदलाबदल झाल्यास तशाही परिस्थितीत निवडणूक लढवून जिंकण्याची तयारी ठेवा, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना इलेक्शन मोडवर आणले.

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित आमदार, मंत्री आणि पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतानाच काही सूचनाही केल्या. ही बैठक जवळपास चार तास चालली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून बसण्याच्या सूचना केल्या. ज्यांचे मुंबई, मंत्रालयात फारसे काम नाही त्यांनी विनाकारण मतदारसंघ सोडून फिरण्यापेक्षा मतदारसंघातच ठाण मांडून बसले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

    निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यालाच आपण उमेदवारी देणार असल्याने मतदारसंघात जेवढी ताकद वाढवता येईल तेवढी वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्याचे समजते. विधानसभा निवडणूक महायुतीमध्येच लढवायची नसल्याने महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी वक्तव्य भाषणांमध्ये वा प्रसारमाध्यमांपुढे करण्याचे टाळा असा सल्लाही त्यांनी दिला.
    महायुतीतर्फे शिवसेना 110 जागा लढविण्याच्या तयारीत असून त्यानुसार त्यांनी 110 विधानसभा निरीक्षकही नेमण्याबाबत या बैठकीत सूचना दिल्याचे समजते. शिवसेनेला विधानसभेत जास्तीतजास्त जागा मिळाव्यात यासाठीच शिंदे यांची ही रणनिती असल्याचे समजते. यासाठी ते भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडे आग्रह करणार असल्याचे समजते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.