Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणे सिम गावात स्मिताताई वाघ यांनाच 573 मतांचे मताधिक्य
    चाळीसगाव

    आ.चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणे सिम गावात स्मिताताई वाघ यांनाच 573 मतांचे मताधिक्य

    editor deskBy editor deskJune 10, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    जळगाव लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे गावात मताधिक्य नसल्याच्या बातम्या काही प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या आहेत. मात्र सदर बातम्या ह्या खोट्या आकडेवारी वर आधारित व दिशाभूल करणाऱ्या आहेत. जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रकाशित केलेल्या गावनिहाय असलेले बुथ क्रमांक व बुथनिहाय झालेल्या मतदानाच्या आकडेवारी वरून आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणे या दोन्ही गावातील तिन्ही बूथ वर भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना 573 मतांचे मताधिक्य असल्याचे स्पष्ट होत आहे. तर दुसऱ्याच गावाच्या बूथ केंद्राची माहिती हे आमदारांच्या गावाची असल्याचा भासविण्याचा प्रयत्न काही वृत्तपत्रांनी केला आहे.

    विशेष म्हणजे याबाबत कोणतेही खातरजमा करण्याची तसदी सदर वृत्तपत्रांनी घेतली नाही. सदर वृत्तपत्र यांनी या खोट्या आकडेवारी वर आधारित बातम्या प्रकाशित केल्याने आमदार मंगेश चव्हाण व भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे, त्यामुळे त्यांनी याबाबत जाहीर खुलासा करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे चाळीसगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम यांनी केली आहे.पत्रकारिता करत असताना अधिकृत आकडेवारीवर आधारित माहिती प्रसारित करावी किंवा विचारणा तरी करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    प्रतिकूल परिस्थितीतही भाजपा महायुतीने तालुक्यात मताधिक्य मिळवत केली लक्षवेधी कामगिरी

    भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या समन्वयक पदी नियुक्ती केली होती. तद्नंतर विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना संधी नाकारून भारतीय जनता पक्षाने एकनिष्ठ अश्या स्मिताताई वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. नामदार गिरिषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी आदी घटक पक्षांशी समन्वय साधत चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्मिताताई वाघ यांना निवडून आणण्याची जबाबदारी स्विकारत पहिल्या दिवसापासूनच लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला.

    एकीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघाची प्रचारयंत्रणा सांभाळत महायुती मधील मंत्री – आमदार यांचा समन्वय साधणे तर दुसरीकडे आपल्या चाळीसगाव मतदारसंघात मताधिक्य राखण्याचे आव्हान असूनदेखील आमदार मंगेश चव्हाण यांनी स्मिताताई वाघ यांना तब्बल १६ हजारांचे मताधिक्य मिळवून देत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.

    विशेष म्हणजे चाळीसगाव मतदारसंघातील सातही जिल्हा परिषद गटात स्मिताताई वाघ यांना मताधिक्य मिळाले आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत व भारतीय जनता पक्षातर्फे स्थानिक उमेदवार दिलेला असताना देखील चाळीसगाव मतदारसंघात ज्या गावांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी उमेदवारांना मताधिक्य मिळाले होते अश्या अनेक गावांना यावेळी भारतीय जनता पक्षाने मताधिक्य व लक्षणीय मते मिळवत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी केली आहे. मात्र वृत्तपत्रातून दिशाभूल करणारी वृत्त प्रसारित झाल्याने विरोधकांकडून हेच वृत्त सोशल माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहे. व त्यातून त्यांचे अपयश सांगण्यापेक्षा भाजपाला कसे अपयश आले हे पटविण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न चालला आहे. विशेष म्हणजे चाळीसगाव मतदार संघाशी निगडित माहिती ही जळगाव प्रतिनिधीच्या नावाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जाते. त्यामुळे वृत्तपत्रांच्या बातमीदारीबद्दल साहजिकच कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले तर ते चुकीचे ठरत नाही. व अशा बातमीदारीबद्दल शंका निर्माण होतात.

    आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणेसिम गावातील मतांची बुथनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे.

    हिंगोणे खुर्द 👇🏻

    – बूथ क्र.133 – स्मिता वाघ – 218 करण पवार – 114
    – (स्मिता वाघ मताधिक्य – 104)

    – बूथ क्र.१३४ – स्मिता वाघ – 285 करण पवार – 119
    – (स्मिता वाघ मताधिक्य – 166)

    हिंगोणे सिम – 👇🏻

    – बूथ क्रमांक 135
    – स्मिता वाघ – 474 करण पवार – 171
    – (स्मिता वाघ मताधिक्य – 303)

    एकूण मताधिक्य – 573
    ——————————

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडणार नाही. ; मुख्यमंत्री फडणवीस !

    December 2, 2025

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.