Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » Breaking News : गळा आवळून चिमुकलीचा खून : सावत्र बापासह आईला अटक
    क्राईम

    Breaking News : गळा आवळून चिमुकलीचा खून : सावत्र बापासह आईला अटक

    userBy userJune 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर प्रतिनिधी | रावेर शहरातील एका भागात ३ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी सावत्र बापासह सख्ख्या आईला अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

    खूनामागील कारण समजू शकले नसून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. माधुरी घेटे व अजय घेटे अशी अटक केलेल्या मुलीच्या आई वडिलांचे नाव आहे. खूनाचे कारण पोलीस तपासात निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

    बेलसवाडी ता मुक्ताईनगर येथील रहिवासी माधुरीचा वारोली येथील भारत मसाने याच्याशी २०१७ मध्ये विवाह झाला होता. माधुरीला पहिल्या पतीपासून ५ वर्षाचा मुलगा पियुष व ३ वर्षाची मुलगी आकांक्षा आहे. मात्र पतीशी पटत नसल्याने माधुरी दोन्ही मुलासह बेलासवाडी येथे राहत होती. त्यानंतर माधुरीने रावेर येथील अजय घेटे याच्याशी काही दिवसापूर्वी लग्न केले होते. तेव्हापासून ही दोन्ही मुले रावेर येथे अजयकडे राहत होती. ३१ मे रोजी अजयने ३ वर्षाची सावत्र मुलगी आकांक्षा हिला दांडक्याने मारले तसेच गळा आवळल्याने ती मयत झाली. ही घटना अजयची पत्नी माधुरीस माहित असताना तिने पुरावा नष्ट करण्याच्या व मृतदेहची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह पतीपत्नीने माहेरी बेलसवाडी येथे नेला. मात्र यावेळी माधुरीचा पहिला पती व मुलीचा सख्खा बाप भारत म्हसाने याला समजल्यावर त्याने बेलसवाडी गाठले.

    त्याने मुलगा पियुष याला विचारणा केल्यावर दुसऱ्या पप्पाने मारले असे सांगितले. मसाने याला मुलीच्या गळ्याजवळ निशाण दिसून आल्याने त्याने अंतुर्ली पोलीस चौकीत मुलीला नेले. पोलिसांनी तेथून मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथे तपासणी केली असता मुलीला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. मुलीचे शवविच्छेदन केल्यावर गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने रावेर पोलिसांनी मुलीची सख्खी आई व सावत्र बाप या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    user
    • Website

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.