Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उद्याच्या भविष्यासाठी करण पाटील मला खासदार पाहिजे : उध्दव ठाकरे
    जळगाव

    उद्याच्या भविष्यासाठी करण पाटील मला खासदार पाहिजे : उध्दव ठाकरे

    editor deskBy editor deskMay 8, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगावः प्रतिनिधी

    मित्रांनो पुढची पिढी तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला मतदानाचा अधिकार असतांना तुम्ही आमच्या भविष्याचा विचार का केला नाही. या साठी तुम्ही आता पासून सावध व्हा. मोदी सरकारची हुकमशाही राजवट संपुष्टात आणण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करीत १३ मे रोजी मोदी सरकारचे तीन तेरा वाजवून ४ जून हा निष्ठावंताचा विजयाचा दिवस रहिल यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जळगाव येथील शिवतीर्थ मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पवार पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत केले.

    पुढे बोलतांना त्यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदींवर देखील टीकास्त्र सोडले. मोदींची गॅरंटी म्हणजे काय तर तुम्हाला हवा तेवढा भ्रष्टाचार करा, जेव्हढे खायचे तेव्हढं खा आणि खाऊन झालं की, भाजप मध्ये या तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे, अशी सनसनीत टीका त्यांनी नरेंद्र मोदींवर केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी सुरतला लुटले होते. मात्र, आता गुजरातची दोन माणसं महाराष्ट लुटताय तरी तुम्ही शांत बसणार आहेत का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
    यांना महाराष्ट्राबद्दल आकस आहे, महाराष्ट्राच्या सुपुत्राने राज्यघटना लिहिली म्हणून यांना घटना बदलायची आहे. पण एक लक्षात ठेवा तुम्ही जर राज्यघटनेला हात लावला तर, संपुर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व भाजपाला दिला. तसेच मनिपूर मधील वातावरण अजूनही शांत झालेले नाही, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे गेले नाहीत, कश्मिर मध्ये अजूनही कश्मिरी पंडीतांना परतता येत नाही, असा पंतप्रदान तुम्हाला हवा आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला असून शेतकऱ्यांच्या विषयावर देखील ठाकरे यांनी मोदी, शहा, फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.