Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार ; पवारांच्या सभेचे मैदान बदलले
    राजकारण

    बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार ; पवारांच्या सभेचे मैदान बदलले

    editor deskBy editor deskMay 5, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून आज बारामती मतदार संघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार असून आज सायंकाळी पाच वाजता बारातमीमधील प्रचार थांबणार आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभांचा धुरळा बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पाहायला मिळणार आहे.

    बारामती लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे या हायहोल्टेज लढतीकडे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सांगता ही मिशन हायस्कूल मैदानावरील सभेने व्हायची. मात्र यंदा पहिल्यांदाच ही जागा अजित पवार यांनी मिळवली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांची सांगता सभा या ठिकाणी होईल.

    सकाळी नऊ वाजता भोरमधील राजा रघुनाथराव हायस्कूल मैदानात शरद पवार यांची पहिली सभा पार पडणार आहे. त्यानंतर मोरगाव रस्ता येथे लेंडी पट्टीच्या क्रिकेट मैदानावर शरद पवारांची सांगता सभा पार पडेल. तसेच सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांची बारामती शहरातून भव्य प्रचारफेरी निघणार आहे. तर दुपारी तीन वाजता अजित पवार यांची सांगता सभा मिशन हायस्कूलचे मैदानावर होईल.

    दरम्यान, शरद पवार यांना प्रचारात साथ देण्यासाठी डॉ. अमोल कोल्हे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. शरद पवार गटाचा राज्यात प्रचार करण्यासाठी शिरूरसोबत अमोल कोल्हे यांनी राज्यव्यापी कॅम्पेन केलं. अमोल कोल्हे यांच्याकडे सहा मतदार संघांच्या प्रचाराची जबाबदारी आहे. स्वतःच्या शिरुर लोकसभा मतदार संघात सकाळी प्रचार करुन अमोल कोल्हे हे सायंकाळी राज्यात प्रचार करताना दिसत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.