Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » म्हसावद येथील थेपडे विद्यालयातील विद्यार्थिनींनी जिंकली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
    जळगाव

    म्हसावद येथील थेपडे विद्यालयातील विद्यार्थिनींनी जिंकली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 7, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथे ‘तालुका मुख्याध्यापक संघ’ यांच्याकडून ‘तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले होते या स्पर्धेत म्हसावद येथील थेपडे विद्यालयातील विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे.

    ‘तालुका मुख्याध्यापक संघ’ यांच्याकडून जळगाव येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत म्हसावद येथील स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धेच्या दुसऱ्या गटात इयत्ता दहावीतील सेजल संजय झवर हिने द्वितीय तर उच्च माध्यमिक विभागातील तिसऱ्या गटात बारावीतील प्रतिभा ज्ञानेश्वर पाटीलने प्रथम तर प्रियंका ज्ञानेश्वर मराठेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

    सर्व विजयी स्पर्धकांचे संस्थेचे चेअरमन डॉ.केदार थेपडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोनार, उपमुख्याध्यापक श्री.बच्छाव, पर्यवेक्षक श्री.भंगाळे, ज्यू.कॉलेजमधून श्री.चिंचोरे व संपूर्ण शालेय परीवाराकडून अभिनंदन करण्यात आले आहे. यात प्रतिभा पाटील या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. स्पर्धेदरम्यान स्पर्धकांना विद्या चव्हाण , संजय पवार, योगराज चिंचोरे, निलेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026

    मिनी ट्रकला भीषण आग; तीन स्फोट, चालकाची प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.